अमळनेर नांद्री : रोजगार व व्यवसायाच्या निमित्ताने शहरात स्थायिक झालेल्या नांद्री गावातील तरुण सुपुत्रांनी आपल्या जन्मभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्र येत **‘नांद्री विकास मंच’**ची स्थापना केली आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करत मंचाच्या माध्यमातून विविध सामाजिक व ग्रामविकासाच्या उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे.

