सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आंतरवासिता गट क्र. २ तर्फे वृक्षारोपण उत्साहात

   अमळनेर : नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील आंतरवासिता गट क्र. ०२ च्या अंतर्गत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये वृक्षलागवडीविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. पी. एम. कोळी होते. यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक अनिल पाटील, गोपाल हडपे, सुनील वाघ, विजेंद्र गवळे, रुपाली पाटील, समाधान पाटील तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक शिक्षक प्रा. एन. जी. पाचपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आंतरवासिता गटप्रमुख कल्पेश सोनवणे व सौरभ पाटील यांच्यासह अक्षय शिसोदे, किरण ठाकरे, भाविका सूर्यवंशी आणि रुपाली तेले यांनी सहभाग घेतला.

    वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!