सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला नागरिक संघ तर्फे व्यसनमुक्ती वर घोषवाक्य स्पर्धा संपन्न….

     अमळनेर नगरीत प्रथमच सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला नागरिक संघ यांच्या वतीने महिला साठी व्यसनमुक्ती वर घोषवाक्य स्पर्धा लेखी स्वरूपात आयोजित करण्यात आली.

    सदर स्पर्धा क्रांतीपर्व स्मारक ढेकूरोड या ठिकाणी घेण्यात आली होती. ही स्पर्धा मराठी व हिंदी भाषेतून व्यसनमुक्ती घोषवाक्य लिहून घेण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला नागरिक संघाचे अध्यक्ष व कार्यकारिणी , स्पर्धक यांनी सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन केले. या स्पर्धेत 35 वर्ष व त्यापुढील 25 महिलांनीं भाग घेतला.स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व कार्यकारिणी संचालक मंडळाने अथक परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!