सविस्तर वृत्त की, भारत देश पारतंत्र्यात असतांना भारतीयां मध्ये देश भक्ती जागृत करण्याकामी बकीमचंद्र चट्टोपाध्याय यानीं लिहिलेल्या वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याने राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयात वंदे मातरम गीताचे सामूहिक वाचन करण्याचे आदेशीत केल्या प्रमाणे नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्याल्यात वंदे मातरम गीताचे विद्यार्थी सह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी गीताचे सामूहिक गायन केले.
याप्रसंगी प्राध्यापिका उषा पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर प्राचार्य डॉ प्रभाकर चौधरी यांनी गीताचे महत्व पटवून देतांना सांगितले की, आपण या भूमीला आईचा दर्जा देतो. तीला पारतंत्र्यातुन मुक्त करण्यासाठी देशातील प्रत्येक जण बलिदान देण्यासाठी प्रेरित व्हावे, त्यांच्यात देशभक्ती जागृत व्हावी म्हणून त्या काळी बाकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातारामनहे गीत लिहिले आणि स्वातंत्र्य मिळण्यासाठी लोकांनी लढा दिला.
या प्रसंगी डॉ अंजली जोशी, डॉ नयना वाणी, डॉ नरेंद्र पाचपांडे, डॉ जितेश चव्हाण, डॉ सुनंदा तायडे, प्रा देवरे, ग्रंथपाल डॉ विजय गाढे, सहाय्य्क ग्रंथपाल श्रीमती विनिता पाटील, शिक्षकेत्तर कैलास भोंगळ,कर्मचारी किरण रावलं, राजू पाटील,अनिकेत पाटील,चेतन पाटील, विनोद पाटील आदी कर्मचारी सह विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),अंतर्गत करियर कौन्सिलिंग सेंटर,राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान,अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष यांच्या संयुक्त…