ज्येष्ठ विधितज्ञ ऍड शलाका अहिरे यांची भारत सरकारने नोटरी म्हणून केली नियुक्ती..

 

कल्याण येथील जिल्हा फौजदारी दिवाणी न्यायालय वकील संघटनेच्या सदस्य ऍड. सौ शलाका विजय अहिरे, Bcom, L.L.B., L.L.M, Dy.Ed. यांना भारत सरकार तर्फे नोटरी या पदावर सन्मानपूर्वक नियुक्त करण्यात आलेले आहे.

वकिली क्षेत्रात मागील 15 वर्षांपासून त्या कार्यरत असून त्या अडव्होकेट फॉर जस्टीस, कल्याण या सामाजिक संघटनेच्या जॉइंट सेक्रेटरी या पदावर कार्यरत आहेत, तसेच कल्याण येथील बुद्धभूमी फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय धार्मिक संघटने मध्ये प्रचारक म्हणून त्या कार्यरत आहेत.

दिवाणी व फौजदारी खटले चालवण्यामध्ये विधी क्षेत्रात त्यांचा हातखंडा आहे. तसेच योगसाधना मध्ये त्यांचा सखोल अभ्यास नाशिक येथील योग विद्या धाम गुरुकुल येथे झाला आहे. त्या सध्या योगशिक्षक म्हणून कल्याण शहरात कार्यरत आहेत.

आज रोजी त्यांची भारत सरकार तर्फे नोटरी या पदावर निवड झाल्यामुळे कल्याण शहरातील विविध सामाजिक, राजकीय तथा शैक्षणिक संघटने तर्फे व प्रतिष्ठित नागरिकांतर्फे त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

ऍड शलाका अहिरे यांचे पती विजय अहिरे हे पोलीस विभागात एपीआय म्हणून कार्यरत असून ते ही एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात.

विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई च्या नाशिक विभागीय उपाध्यक्ष प्रा डॉ विजय गाढे यांनी त्यांच्या या यशाबद्दल भ्रम्हनध्वनी द्वारे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!