भारत टॅलेंट सर्च परीक्षेत सु. हि. मुंदडे हायस्कूलचे सात विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश   

अमळनेर येथील सु. हि. मुंदडे हायस्कुल मारवड येथील विद्यार्थ्यांनी भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत ग्रामिण भागातून तालुकास्तरावर मजल मारली असून घवघवीत यश मिळविले आहे.

सदर परीक्षेस विदयालयातील इयत्ता 5 ते 8 मधून 11 विद्यार्थी प्रविष्ठ होते त्यापैकी 7 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले. तालुक्यातील परीक्षा केंद्रातून इयत्ता 5 वीतून कु.माहेश्‍वरी रविंद्र साळुंखे प्रथम तर जिल्ह्यातून दहावा क्रमांक प्राप्त केला, कु.प्राची सतीष पाटील चौथा क्रमांक तर चि.राज सतिष पारधी हा सहावा क्रमांकाने उत्तीर्ण झाला. इयत्ता 7 वी तून विजय मुकूंदा माळी प्रथम क्रमांक, रोहीत शरद मोरे सहावा क्रमांक तर समर्थ मोहन गुरव यांनी आठवा क्रमांक पटकाविला. इयत्ता 8 वीतून विद्यालयातील विद्यार्थीनी कु.संध्या छन्नु मोरे हीने प्रथम क्रमांक पटकाविला.

ग्रामिण भागातून अशा पध्दतीचे भारत टॅलेट सर्च परीक्षेत उत्तुंग यश मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष, सचिव तसेच सर्व कार्यकारीणी सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

या परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक तसेच बीटीएस परीक्षेचे मार्गदर्शक योगेश पाने यांनी केले तर आभार प्रदर्शन एन. वाय. साळुंखे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!