अमळनेर येथील मा.उपविभागीय अधिकारी श्री.नितीनकुमार मुंडावरे तसेच तहसीलदार श्री.रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम सुरू केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून मौजे सडावण पारोळा रस्त्यावर अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळल्याने ते पकडण्यात आले. सदर ट्रॅक्टर मुद्देमालासह अमलनेर तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले. सदर पथकात पी.एस. पाटील मंडळ अधिकारी वावडे भाग, श्री.आशिष पारधे ग्राम महसूल अधिकारी वावडे-सारबेट,श्री.जितेंद पाटील ग्राम महसूल अधिकारी मांडळ शिरसाले बु, श्री.सचिन बमनाथ ग्राम महसूल अधिकारी करणखेड़ा,श्री अमोल चक्रे ग्राम महसूल अधिकारी जवखेड़े हे होते.
महसूल कर्मचाऱ्यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर घेतले ताब्यात..
