अमळनेर,महाराष्ट्र शासन नगर विकास विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात अमळनेर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा वरचष्मा.

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत दि. २८/१२/२०२४ ते २/१/२०२५ आयोजित जिल्हास्तरीय नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांसाठी आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत अमळनेर नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांनी क्रिकेट, रस्सीखेच, सोलो सॉंग, सोलो डान्स, गृप, डान्स, ४०० रनिंग मीटर,या क्रीडा प्रकारात दिगंबर वाघ, सुदर्शन शामनानी, महेश जोशी, कृणाल कोष्टी, कुणाल महाले, या अधिकारी वर्गाने (ग्रुप डान्स प्रथम बक्षीस)तर उज्वला पाटील, राधा नेतले, कीर्ती गाजरे, अरुणा बहारे, पूजा उपासणी, या महिला वर्गाने (रस्सीखेच)तर नितीन गढरे(सोलोसॉंग प्रथम),नितीन पवार, परम चव्हाण(सोलो डान्स प्रथम व द्वितीय),अक्षय मोरे,(४०० मीटर ) तर व्हॅलीबाल मध्ये श्री. शामनानी,कुणाल महाले, किरण कंडारे, अजित लांडे, प्रमोद लटपटे,सागर पवार,संतोष संदानशिव सावंत,आकाश संदानशिव, सिद्धार्थ कढरे या अधिकारी, कर्मचारी तर सफाईगार कर्मचाऱ्यांनी अमळनेर नगरपरिषदेस ट्रॉफ्या मिळवून दिल्यात.
तर या सांस्कृतिक कार्यक्रमात सोमचंद संदानशिव, अनिल बेंडवाल, ईश्वरलाल पाटील,कमलेश संदानशिव यांनी देखील स्पर्धेत सहभाग नोंदवला.
या सर्व विजेते आणि सहभागी कर्मचाऱ्यांचे परिविक्षाधीन IAS अधिकारी तथा मुख्याधिकारी वेवोतोलू केजो, मुख्याधिकारी, श्री. तुषार नेरकर, उप मुख्याधिकारी श्री.रवींद्र चव्हाण,आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, किरण कंडारे,व महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत व संवर्ग अधिकारी कर्मचारी संघटना तसेच विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.
