जागतिक दर्जाचे श्वान प्रदर्शन मुलुंड मध्ये विविध प्राण्यांना एकाच ठिकाणी पाहण्याची सुवर्ण संधी

 

मुंबई प्रतिनिधी, जागतिक दर्जाचे श्वान प्रदर्शन मुलुंड पश्चिम येथील सेंट पायस् एक्स हायस्कुल येथे भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनात विविध जातींचे भारतीय तसेच विदेशी श्वान पहायला मिळणार आहेत. त्याच बरोबर पोपट, सरडा, मांजर, कोंबड्या या सारखे विविध जातींचे पक्षी व प्राणीही याठिकाणी पहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत चालणार असल्याची माहिती या प्रदर्शनाच्या आयोजिका आणि जीवनदान संस्थेच्या अध्यक्षा राजोल संजय पाटील यांनी दिली आहे.

या श्वान प्रदर्शनाला सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत भेट देता येईल. हे प्रदर्शन ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत चालणार असून या प्रदर्शनात जागतिक दर्जाचे श्वान, पोपट, सरडा, मांजर, कोंबड्या तसेच इतर प्राणी, पक्षी पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाचे आयोजन राजोल संजय पाटील यांनी केले असून दोन दिवस चालणारे हे प्रदर्शन मुलुंड पश्चिम येथील सेंट पायस एक्स हायस्कुल, सेंट पायस् रोड येथे भरविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!