पारोळा : विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण, विविध आजारांचे वेळीच निदान आणि आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय, पारोळा येथे इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी व समुपदेशन उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात एकूण ५७६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ९० विद्यार्थ्यांना मोफत उपचार मिळणार आहेत.

