अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवाच्या परंपरेप्रमाणे गुरु संत सखाराम महाराज गादी पुरुष संत प्रसाद महाराज यांनी शिष्य बेलापूरकर महाराज यांचे अमळनेर च्या वेशीवर जाऊन टाळ मृदूंगाच्या स्वरात जंगी स्वागत केले व सन्मानाने मिरवणुकीने वाडी संस्थान मध्ये आणले.

सविस्तर वृत्त की,आख्यायिका नुसार अमळनेरातील संत सखाराम महाराज यांना थोर भक्त पांडुरंग पंढरपुरातून प्रति पंढरपूर अमळनेर येथे भेटण्यासाठी आलेले असतात.
संत सखाराम महाराजांचे शिष्य हभप मोहन बेलापूरकर महाराज यांचे दिनांक 6 रोजी सायंकाळी आर के फॅक्टरीत आगमन झाले. सकाळी बेलापूरकर महाराज आर के नगरच्या गणपती मंदिरात आले. उद्योगपती विनोद पाटील व त्यांच्या परिवाराने परंपरेप्रमाणे त्यांचे पाद्यपूजन केले. गुरू संत सखाराम महाराजांचे गादी पुरुष हभप प्रसाद महाराज यांनी आर के नगर मध्ये जाऊन आपले शिष्य हभप बेलापूरकर मोहन महाराज यांचे स्वागत केले. तेथून दोघे गुरू शिष्य शिग्राम मध्ये बसले. शिग्राम पुढे बाल वारकरी आणि भजनी मंडळ टाळ मृदुन्ग वाजवत विठ्ठल नामाचा , पांडुरंगाचा नाम जप करत संत सखाराम महाराजांचा जयघोष करत वाडी संस्थांनकडे आले.
आज दिनांक ८ रोजी रथ मिरवणूक निघणार असल्याने पालिकेच्या अग्निशमन दलाने रथ धुवून स्वच्छ केला. रथ मार्गावरील रस्ता दुरुस्ती करण्यात आली.
रथ यात्रेच्या पारश्वभूमिवर तगडा बंदोबस्त….
अप्पर पोलीस अधीक्षक सुनीता नेरकर यांच्या मार्गदर्शना खाली अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते , परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह ११अधिकारी,१५५ महिला व पुरुष पोलीस अंमलदार , १० एलसीबी पोलीस ,११ वाहतूक पोलीस , ६० पुरुष ,२०महिला होमगार्ड , दोन दंगा नियंत्रण पथक , तसेच रथ मार्गावर बॉम्ब शोधक नाशक पथक असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
