चैत्र नवरात्रीनिमित्त मंगळग्रह मंदिरात नवचंडी याग उत्साहात संपन्न

 

अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात काल (ता. ५) रोजी भव्य नवचंडी याग भक्तीमय व उल्हासित वातावरणात आठरा यजमानांच्या साक्षीने दोन सत्रात संपन्न झाला.

हा नवचंडी याग सकाळी 9 ते 12 व दुपारी 2 ते 6 या दोन सत्रात एकूण १८ यजमानांच्या साक्षीने संपन्न झाला.

चैत्र नवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात विशेष आकर्षक सजावट केली होती, यागाच्या मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर भक्तीमय व चैतन्यमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. या पूजेची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल यजमानांनी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

या यागमध्ये गणपती पूजन,पुण्याहवाचन, मातृकापूजन,वास्तुमंडल, योगिनी मंडल, क्षेत्रपाल मंडल पूजन, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कुंकूमार्चन, नवग्रह हवन, दुर्गा सप्तशती हवन, बलिदान व पूर्णाहती असे विविध विधी पार पडले. आरतीने यागाची सांगता झाली.

यावेळी नवचंडी यागाचे यजमान विवेक अहिरे, डॉ. हेमंत कदम, प्रा. पुरुषोत्तम भुतडा, गोपाल पिंगळे, शरद सोनवणे, निलेश जैन, रामेश्वर घुगे, ॲड. गिरीष पाटील, सुभेदार मेजर नागराज पाटील, मेजर सुरेश पाटील, गणेश कलंत्री, किरण कुंभार, रोहित तेले, नरेंद्र सोनार, ॲड. यज्ञेश्वर पाटील, प्रितम पाटील, अनिल घासकडबी आदींच्या हस्ते नवचंडी याग उत्साहात संपन्न झाला.

या नवचंडी यागासाठी शुभम्‌ वैष्णव, तुषार दिक्षित, जयेंद्र वैद्य, वैभव लोकाक्षी, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, विनोद पाठक, यांनी पौराहित्य केले. त्यांना गोपाल पाठक, प्रविण भंडारी, चेतन नाईक व किशोर कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. या पवित्र व मंगलमय प्रसंगी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त एस एन पाटील, सुरेश बाविस्कर, दिलीप बहिरम व अनिल अहिरराव , मंदिराचे सेवेकरी व असंख्य भाविक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!