अमळनेर येथील वेश्याव्यवसाय माननीय उच्च न्यायालयाच्या ९ऑक्टोबर २४ च्या आदेशाप्रमाणे त्वरित बंद करा अन्यथा मुंबई उच्च न्यायालयाची संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल करणार यासाठी अमळनेर शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

अमळनेर येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून दुपारी अडीच वाजता या मूक मोर्चाला सुरुवात झाली.
सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यारर्परण करण्यात आले व पवित्र कुराण पठण करून मोर्चा निघाला.
*मोर्चा समारोप प्रसंगी यांनी केले मार्गदर्शन*
उच्च न्यायालयाचे याचिका कर्ते व मोर्चाचे मुख्य समन्वयक रियाज शेख यांनी मोर्चाचे आयोजनाचे महत्त्व विशद केले.त्यानंतर भागवत अण्णा गुरुजी, सामाजिक कार्यकर्ता संदीप घोरपडे, सोमचंद सांधशिव, यशवंत बैसाणे, अरविंद बिऱ्हाडे, बाळासाहेब शिंदे, एड अभिजीत बिऱ्हाडे ,मनोज मोरे, काँग्रेसचे मनोज बापू , पाचोर्याचे अझर खान, एकता संघटनेचे फारुक शेख यांनी सुद्धा आप आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा कुंटण खाना नागरी वस्तीतून स्थलांतर होणे आवश्यक आहे, या वस्तीमध्ये देह व्यापार करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचा या व्यवसायास प्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई करण्यात येईल अशी मागणी करण्यात आली.
*प्रशासनातर्फे यांनी स्वीकारले निवेदन*
उपविभागीय दंडाधिकारी नितीन मुंडावरे व सहाय्यक पोलीस अधीक्षक केदार बारबोले यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.
*निवेदन यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले*
निवेदन देताना परीक्षक यांनी फारुक शेख यांनी निवेदनाचे वाचन केले व प्रशासनाकडून काय अपेक्षा ते विधीत केले त्यावेळी फारुक शेख सह मोर्चाचे समन्वयक रियाज शेख,कुदरत अली सय्यद,योगराज संदानशिव,अर्जुन संदानशिव,किरण बहारे,मनोज बापू , अजहर शेख, मनोज मोरे, शेर खान पठाण, आबीद अली सय्यद, आकिब अली सय्यद, अल्तमस शेख, मोईज अली, राजू शेख आदींच्या हस्ते देण्यात आले.
*मोर्चात यांचा होता सहभाग*
जळगाव चे फारूक शेख, अनिस शहा, ताहेर शेख, अल्ताफ शेख, अब्दुल रऊफ टेलर, पाचोर्याचे अझर शेख, अमळनेर चे गौरव साळुंखे आप्पा पारधी प्रभाकर पारधी,अरविंद बिर्हाडे,प्रताप दगडू बन्सीलाल भागवत रामदास रूपला, रमेश घोलप नीतीश लोहरे, अनिल चंडाले, फिरोज मिस्तरी , मुक्तार खाटीक, इमरान खाटीक, अब्दुल गफार खाटीक , आरिफभाई तेली, शाहरुख सिंगर, मोहसीन जडीबुटी, अकरम शेख, रफिक शेख, कलीम फ्रुट वाले, अख्तर अली सय्यद, राहील पठाण, मोहसीन शेख, हैदर मिस्तरी, फिरोज पैलवान, सलमान शेख, जावेद शेख, रवी शेख, राजू काजी, अल्ताफ राजा, शरीफ शेख, सईद , रिजवान मणियार, अजहर सय्यद आदि हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
