अमळनेर येथील गोपाल गजरे यांचा मुलगा चिं हेमंत च्या विवाह सोहळात पारंपारिकतेला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जपत आहेर न देता त्यानिमित्त आलेल्या पाहुण्यांना भारतीय सविधान सह पुरोगामी विचारांच्या विषयावरील पुस्तकांचे वाटप केले.यामागील गोपाल गजरे यांचा उद्देश हा यानिमित्त समाजात संविधानाबद्दल जनजागृती तसेच समाजात महापुरुषांचा आंदोलन माहिती व्हावी,यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे दिसून आले.

विवाह सोहळ्यात उपस्थित पाहुण्यांनी गजरे कुटुंबाचे कौतुक करून अभिनंदन केले व आम्हीही आमच्या कुटुंबातील विवाह सोहळ्यात भांडे अथवा कपडे नदेता संविधान वाटप करणार असल्याचे सांगितले.
