अमळनेर येथील विधानसभा निवडणुकीत कोणत्याच प्रकारचा गोंधळ गडबड न होता निवडणूक प्रक्रिया अतिशय शांततेत व खेळी मेळीच्या वातावरण पार पडल्याने महसूल व पोलिस प्रशासनाचे होत आहे कौतुक.

अमळनेर विधानसभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.मंत्री अनिल पाटील यांच्या विरुद्ध आघाडी चे उमेदवार डॉ अनिल शिंदे सह तब्बल दहा अपक्ष उमेदवार दंड थोपटून उभे ठाकले आहेत.मात्र या निवडणुकीत चुरशीची लढत ही युतीचे मंत्री अनिल पाटील,आघाडीचे डॉ अनिल शिंदे व अपक्ष उमेदवार माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यात बघायला मिळते.मागील अमळनेर नगरपालिका निवडणुकीत निर्माण झालेल्या कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न याही निवडणुकी होतो की काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत होते.मात्र पोलिस प्रशासनाने या गोष्टीची चाचपणी करून तगडा बंदोबस्त तैनात केला होता.कायदा हातात घेतल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागणार असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिला होता.त्यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विकास देवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अहोरात्र बंदोबस्त ठेवून कायदा सुव्यवस्था अबाधित राहील या करीता काळजी घेतली होती.वातावरणातील वाढता गारवा याची तमा नबाळगता रात्रीच्या गस्ती डोळ्यात तेल घालून केल्या.प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी आपले कर्तव्य इमाने इतबारे निभावल्याने मतदारांनी आपला मतदानाचा हक्क भयमुक्त वातावरणात बजावला.
या विधानसभा निवडणुकीत महसूल प्रशासनाचे विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी नितीन मुंडेवर यांनी आपल्या बुध्दी कौशल्यावर नियोजनबद्ध निवडणूक प्रक्रिया सुरळीत कशी पार पाडता येईल या करीता कसोशीने प्रयत्न केल्याचे बघायला मिळाले. शिस्तबद्ध प्रशिक्षण,कर्मचाऱ्यांची वाहतूक योजना, ईव्हीम सह व्हीव्हीपॅट मशीनची सुरक्षितता,मतदान वाढीसाठी मतदारांमध्ये केलेली जन जागृती व त्यातून केलेले आवाहन,राजकीय पक्ष तथा उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या चौकटीत राहून प्रचार प्रसार करण्याचे घालून दिलेले नियम काटेकोर अंमलबजावणी वर करडी नजर,निवडणुकी कामी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची योग्य जुळवणुक करून त्यांच्या माध्यमातून सदरची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी वारंवार मार्गदर्शन,मतदान दिवशी बाहेरील तालुक्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांना सुरुची भोजनाची व्यवस्था व त्यांना आपल्या गावच्या तालुका ठिकाणी जाण्यासाठीची वाहतूक व्यवस्था,सर्वात महत्वाचे म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने मतमोजणी साठी गावा बाहेरील निवडलेली जागा अतिशय योग्य निर्णय त्यांनी घेतला.
निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडेवार साहेबांनी आपले विशेष सहकारी शिलेदार तहसिलदार रुपेश कुमार सुराणा,मुख्यधिकारी तुषार नेरकर,प्रशांत धमके,ढोले रावसाहेब,नायब तहसीलदार कुलकर्णी,पुरवठा अधिकारी शेख मॅडम,डी ए धनगर सर, बांधकाम चे श्रीकांत चिखलोदकर,आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे,मुकादम दिपक संदानशिव,प्रथमेश पिंगळे, अशोक ठाकरे, जगदीश पाटील,मुकेश काटे,घोंगडे मॅडम,श्याम शिंपी,शिवाजी कोळी,अनिल संदानशिव,अनिल चौधरी,कैलास पाटील,बस आगर प्रमुख प्रमोद चौधरी,मुकेश सेंदाने आदींच्या सहकार्याने सदर निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडल्याने त्यांचे सर्वांचे आमच्या करडी नजर न्युजच्या माध्यमातून आभार व्यक्त करून त्यांचे कौतुक करतो.
निवडणुकीत मतदारांनी आपला दाखवलेला उस्ताह व बजावलेल्या मतांचा अधिकार पाहता त्यांचेही करडी नजर न्युज कडून आभार व्यक्त करतो.
करडी नजर न्युजचे विशेष आभार……
अमळनेर विधानसभेच्या निवडणुकीत चुरशीची लढत झाली.मात्र प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेला संयम वाखण्याजोगी होता.मतदार संघात कुठेही वाद विवाद झाला नाही.अगदी खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली.तसेच निवडणुकीतील उभे असलेल्या उमेदवारांनी देखील आपला संयम ढळू दिला नाही.असे कोणतीच कृती अथवा वक्तव्य केले नाही जेणे करून कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल.उमेदवार हे आप आपल्या कार्यकर्त्यांना मतदान जास्तीत जास्त कसे होईल या करीता वांरवार सूचना व मार्गदर्शन करताना व्यस्त दिसले.मतदारांना लक्ष्मीचे दर्शन व्हावे म्हणून उमेदवारांनी एकमेकांना आडकाठी केली नाही.सर्व सुरळीत सुरू ठेवले.म्हणून करडी नजर न्युज या सर्वांचे विशेष आभार मानतो व अपेक्षा व्यक्त करतो की मतमोजणी दिवशी सुध्दा असेच संयमाचे दर्शन घडवाल व राज्यात एक आदर्श निर्माण कराल.
