अमळनेर प्रतिनिधी, येथील सर्व जाती धर्मातील, सर्व क्षेत्रातील आणि सर्व स्तरातील लोक जेथे मिळून मिसळून राहतात तो गट म्हणजे आमचा कळमसरे- जळोद जिल्हा परिषद गट, क्रांतीकारकांचे योगदान आणि विविध देवस्थानांचे वैभव शाश्वत लाभलेला हा परिसर कायम भाजपच्याच सोबत राहिला असून यंदाही महायुतीच्याच पाठीशी असल्याने महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना संपुर्ण गटातून भरभरून असे मतदान होईल असा विश्वास भाजपाचे माजी जि प सदस्य ऍड व्ही आर पाटील यांनी व्यक्त केला आहे.
धार्मिक आणि क्रांतिकारकांच्या भूमीला विकासाभिमुख करण्याचे काम मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले.रस्ते काँक्रीटीकरणं,शेत रस्ते, प्रवेशद्वार, सुशोभीकरण, शाळा खोली बांधकाम,सभा मंडप,ग्रामपंचायत कार्यालय, संरक्षण भिंत,भक्तनिवास, पेव्हर ब्लॉक सुशोभीकरण, स्मशानभूमी,सांत्वन शेड यासारखी कामे पूर्ण झालेली आहेत.गटातील इतर गावांना देखील न्याय देण्यात ते कुठे कमी पडलेले नाहीत.

गावोगावी शाश्वत विकास या भूमीपुत्राने करून दाखविला असल्याने विकास आणि महायुती या दोन गोष्टीं या गटातून त्यांना मतदान करण्यासाठी पुरक असून प्रचार दौऱ्यात प्रत्येक गावातून त्यांना प्रतिसाद मिळाला आहे. गटातील प्रत्येक व्यक्ती व आमचा संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या सोबत आहे. मतदानाच्या दिवशी निश्चितच त्यांच्यावर मतांचा भरभरून असा पाऊस पडेल असा विश्वास व्ही आर पाटील यांनी व्यक्त केला.
