शिरीष चौधरी यांचा शहरात झालेल्या प्रचार रॅलीला उत्सपूर्त प्रतिसाद….

 

अमळनेर प्रतिनिधी, येथील अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांना शहरात प्रचार रॅली दरम्यान नागरिकांकडून मिळतोय उत्साही प्रतिसाद.

सदर च्या रॅलीत शेतकरी, व्यापारी, कष्टकरी आणि तरुणांनी शिरीष चौधरी यांच्या सोबत संवाद साधत विविध समस्यांवर चर्चा करून त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या, ज्यात गुंडागिरी, दुष्काळ, आणि पिक विमा यांचा समावेश आहे. अमळनेर शहरात गेल्या पाच वर्षांत गुंडागिरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गुंडागिरीमुळे सामान्य माणसाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे, अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या पीक लागवडीचा विमा कोणत्याही कारणाशिवाय नाकारल्याने त्यांचे आर्थिक भविष्य धोक्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष वाढत चालला आहे. याबाबत ह्यां विधानसभेत जनतेने मागणी केली आहे की, शेतकऱ्यांच्या हक्कांप्रति जागरूकता निर्माण करणारा जनसेवक म्हणून शिरीष चौधरी यांना निवडून देने अत्यावश्यक आहे. तालुक्याचा पाहिजे तसा विकास झाला नाही त्यांनी असंतोष व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!