“गौरव कार्य कर्तृत्वाचा – सन्मान त्या बळीचा” कष्टकरणाऱ्या बळीचा समाजाने सन्मान करावा – श्याम पाटील 

 

अमळनेर प्रतिनीधी येथील बळीराजा शिवार फेरी निमित्ताने संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष श्याम पाटील हे अमळनेर विधानसभा मतदार संघातील गांवागांवात जाऊन बळीराजाच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यावर भविष्यात उपाय योजना करण्याकामी बांधा पर्यंत पोहचत असताना कष्टकरी कुटुंबाच्या यशाचा गौरव सुध्दा करीत आहेत.बळीराजाच्या कष्टाला उजाळा सुध्दा देत आहे.त्यांनी करडी नजर न्युजला अशीच एका कष्टकरी शेतकरी कुटुंबाची गाथा मांडली.

शिवश्री श्याम पाटील हे अमळनेर तालुक्यातील खेडी या गावी गेले असता तेथील मा.कैलास वामन पाटील व मा.भगवान वामन पाटील या शेतकरी बांधवां विषयी माहिती मिळाली.दशक भरापूर्वी अल्पभूधारक असलेल्या ह्या शेतकरी कुटुंबाने मेहनतीच्या जोरावर स्वकर्तुत्वाने आपले शेतीचे क्षेत्रफळ ३० एकर पर्यंत नेले आहे.

कैलास दादा यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही वर्षांपासून हे दोन्ही बंधू शेतात फक्त हरभरा या पिकाचे उत्पन्न घेत असतात व त्यासाठी ते शेजारील काही लोकांची शेती देखील कसायला घेतात.मागील वर्षी या कुटुंबाने ६० एकर क्षेत्रात सुमारे ६५० क्विंटल हरभर्याचे उत्पन्न घेतले. या संपूर्ण क्षेत्रात ते स्वतःच पेरणी पासून ते फवारणी व काढणीचे काम करत असतात.

संपूर्ण पंचक्रोषित त्यांच्या शेती निष्ठे विषयी आदराने बोलले जाते परंतु आज पर्यंत या शेतकरी कुटुंबाच्या श्रमाची दखल कुठल्याही शासकीय यंत्रणेने किंवा लोकप्रतिनिधींनी घेतली नसल्याची खंत वाटते. दोन्ही भावंडांची मुले व मुली उच्चशिक्षण घेत आहेत. भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देत भविष्यात शासन स्थरावर त्यांचा योग्य सन्मान व्हावा त्यांच्या जिद्दीला उजाळा मिळावा v त्यातून ईतर समाज बांधवांना जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द त्यांना श्याम पाटील यांनी दिला.यावेळी त्यांच्या सोबत खेडी येथील निलेश पाटील व राजमुद्रा फाउंडेशनचे उपाध्यक्ष अक्षय चव्हाण हे देखील उपस्थित होते…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!