उबाठा सेनेच्या राज्य संघटक पदी ॲड ललिता पाटील यांची वर्णी

अमळनेर प्रतिनिधी,येथील ऍड ललिता पाटील यांची शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धव साहेब ठाकरे यांच्याआदेशान्वये शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.

मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसा अगोदर भाजपा मधून उबाठा सेनेत प्रवेश केलेल्या ऍड ललिता पाटील यांना जळगांव लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळालेली नसतांना पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार एकनिष्ठता पूर्वक केला,त्यांच्यातील कार्यकर्ते संघटन कौशल्य तसेच नुकत्याच अमळनेर येथे संपन्न झालेला शिवसेनेचा मेळावा व तो यशस्वी करण्यासाठी केलेली मेहनत.या सर्वांचे अवलोकन पक्षाच्या वरिष्ठांनी करुन त्यांना उबाठा सेनेच्या राज्याच्या संघटक पदी नियुक्ती केली. पक्ष प्रवेशाच्या अल्पावधीत त्यांच्या निवडीने अंमळनेर तालुका व शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

या निवडबद्दल तालुका कार्यकारणीचे शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार, माजी तालुका अध्यक्ष विजय पाटील, माजी नगरसेवक दादा पवार,शेतकरी सेनेचे देवेंद्र देशमुख,ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील, भैया पाटील आदींनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन करत सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!