अबब!!! अमळनेरात सलग दोन दिवसात दोन पॉस्को व दोन बलात्काराचे गुन्हे दाखल

अमळनेर प्रतिनिधी,येथील पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे गुन्हे दाखल.

महाराष्ट्रात बदलापूर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेला बलात्काराची घटना ताजी असतानाच अमळनेर मध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचे गुन्हे सलग दोन दिवसात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील जवखेडा येथील बारा वर्षाच्या मतिमंद मुलीवर पासष्ट वर्षांच्या माणसाने विनयभंग केल्याप्रकरणी काल दिनांक २२ रोजी पोलिस ठाण्यात मुलीच्या आई च्या तक्रारी वरून पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.तर आज शहरातील ताडेपुरा भागातील मुस्लिम समाजाच्या मुलीला पळवून नेऊन तिच्यावर शिरपूर येथे नातेवाइकांच्या घरी दोनदा बलात्कार केल्याने एकावर पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

यावरून तालुक्यात कायदा व्यवस्थेचा प्रश्न एरनिवर आला असल्याचे बोलले जात आहे.कायद्याचा धाक नराधमावर दिसत नाही.यामुळे अश्या घटना सर्वत्र होताना दिसत आहे.या बाबतीत सरकारने कडक शिक्षेची तरतूद करणे आवश्यक असल्याचे सुज्ञ नागरिक मत व्यक्त करीत आहे.तसेच अश्या घटनांचे सत्ताधारी व विरोधक यांनी राजकीय दृष्टीने पाहू नये.अशी सर्व साधारण इच्छा नागरिक करीत आहे.तर या विषयावर संसदेत अतिशय कडक कायदा करण्याकामी एकमेकांना सहकार्य करने गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!