अमळनेर (प्रतिनिधी) : खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथे ‘स्कॉलर प्रतापियान-२६’ निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने आयोजित कार्यशाळा आणि प्राथमिक फेरीतील वस्तुनिष्ठ परीक्षा उत्साहात संपन्न झाली. महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग मॉनिटरिंग सेंटर (CCMC) व स्पर्धा परीक्षा समुपदेशन केंद्राच्या वतीने १२ ते २१ ऑक्टोबरदरम्यान दुपारच्या सत्रात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

