अमळनेरचे ‘दिव्य खान्देश’चे संपादक सुरेश कांबळे यांना पाचोरा येथील अधिवेशनात मानाचा ‘युवा पत्रकार पुरस्कार’ प्रदान

     अमळनेर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पाचोरा येथे आयोजित ‘उत्तर महाराष्ट्र स्तरीय अधिवेशन – २०२६’ मध्ये अमळनेर येथील ‘दिव्य खान्देश’ वृत्तपत्राचे संपादक श्री. सुरेश हिरामण कांबळे यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय आणि समाजोपयोगी योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘युवा पत्रकार पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

    दिनांक १० ऑक्टोबर रोजी अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या भव्य अधिवेशनात पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर पाटील, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, प्रा डॉ. विजय गाढे, खान्देश विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे, जिल्हाध्यक्ष मुकुंद नन्नावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते श्री. कांबळे यांना हा गौरवशाली पुरस्कार प्रदान करण्यात आला.

       श्री. सुरेश कांबळे यांनी पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ जपलेली निष्ठा, त्यांची गतिमान कार्यशैली आणि लोकहिताच्या प्रश्नांवर वृत्तपत्राच्या माध्यमातून दिलेले योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक विकासाला दिशा देणाऱ्या त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत पत्रकार संघाच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.

      त्यांच्या या यशाबद्दल अमळनेरसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारिता, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!