अमळनेर:भुसावळ येथे ‘कॅशिअस स्पोर्ट्स अकॅडमी’ तर्फे आयोजित ‘मिशन ऑलिम्पिक बॉक्सिंग डेव्हलपमेंट’ स्पर्धेत अमळनेरच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत पदकांची लयलूट केली. जिल्ह्याचे बॉक्सिंगचे केंद्र समजल्या जाणाऱ्या भुसावळमध्ये अमळनेरच्या ‘B.BOYS अकॅडमी’ च्या सात विद्यार्थ्यांनी पदके जिंकून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

