अमळनेर येथील मराठा समाज महिला मंडळाच्या ९व्या वर्धापन दिनी हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला.

मराठा समाज महिला मंडळाचा ९ वा वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली.याप्रसंगी अध्यक्ष व खजिनदार पद्मजा पाटील यांनी मागील वर्षाचा हिशोब सादर केला. अहवाल वाचन केले. तसेच महिलांचे विविध खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या.विशेष बाब म्हणजे सण २०१६ जानेवारीत मकरसंक्रांत दिनी हळदीकूंकुच्या कार्यक्रमापासुन या मंडळाची सुरूवात झाली. अध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील यांच्या संकल्पनांतुन या मंडळाची सुरूवात झाली. त्यांना जयश्रीताई अनिल पाटील, सुलोचनाचाई वाघ, सौ. सुनिताताई पाटील, अलकाताई पाटील, मंगलाताई पाटील, भारती पाटील (आधार संस्था), शिलाताई पाटील, कमलआक्का पाटील, प्रभाताई पवार, माधुरीताई पाटील, मनिषाताई पाटील, रागिणीताई पाटील, पद्मजाताई पाटील, भारती पाटील (भैरव), लीना पाटील या सर्वांची साथ लाभली.
मंडळातील महिलांनी आपल्या कौटुंबिक जीवनातील काही क्षण वेगळा काढून एकत्रित येऊन आनंद उत्सव साजरा केला. महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होते. सर्वानी दरवर्षी असेच एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प यावेळी केला.
तिलोत्तमाताई पाटील यांनी प्रास्ताविक केले. लीनाताई पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
