अमळनेरात धार्मिक भावना दुखावल्याने सहा जणांवर गुन्हे दाखल

अमळनेर प्रतिनिधी,येथे दि १९ रोजी शहराच्या विविध भागातुन ईद निमित्त जुलुस काढण्यात आले असता त्यामध्ये धार्मिक भावना दुखावतील अश्या घोषणा देऊन हिरवा झेंडा फडविल्या प्रकरणी गुन्हे दाखल.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादिने दिलेल्या तक्रार नुसार दि १९ रोजी अमळनेर शहराच्या विविध भागातून मुस्लीम समाजाने जुलूस काढले होते .यात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. दरम्यान शाहआलम नगर कडील जुलुस हा आखाडा मैदानाकड़े जात असतांना झामी चौक जवळ आला असता त्यावेळी मिरवणुकी्तील काही मुस्लिम तरुणांनी हिदु धर्माच्या लोकांच्या घरासमोर धर्मिक तेढ निर्माण होइल अशा स्वरूपाचे गाणी वाजवून प्रक्षोभक स्वरूपाच्या घोषणा देवुन शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला व . एका अनोळखी तरूण याने गावठी पिस्तूल द्वारे दोन वेळा फायर केला व एका अज्ञात इसम याने पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या मुळे देशाच्या एकात्माता आणि अखंडता धोक्यात आणण्याचे उद्देशाने चिथावणीखोर घोषणा देऊन शहरातील दगडी दरवाज्यावर हिरवा झेंडा फडकविला यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याने जवळपास पाच ते सहा जणां विरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि,भगवान शिरसाठ करीत आहे.

 

पोलिस निरीक्षक विकास देवरे….

घटनेचा निष्पक्ष तपास करून गुन्ह्यातील सत्यता पडताळून आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सामाजिक सलोखा बिघडवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!