अमळनेर : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात पोलीस संघाने दणदणीत विजय मिळवला. या मैत्रीपूर्ण झालेल्या या सामन्यात पोलीस संघाने पत्रकार संघावर मात करत विजयाची मोहोर उमटवली.

