अमळनेर प्रतिनिधी येथील सूंदरपट्टी गावचे रहिवासी गोपाळ पाटील यांच्या वर खुनी हल्यात सहभागी असलेल्या सात्रि येथील माजी सरपंच व पोलीस पाटील यांना तात्काळ अटक करा अन्यथा कुटुंबासह पोलिस अधीक्षक कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सुरेश पाटील यांनी दिला इशारा.

सविस्तर वृत्त असे की सुरेश पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, सात्री येथील माजी सरपंच महेंद्र बोरसे यांच्या सोबत रेशन दुकाना वरून किरकोळ वाद झाला होता.त्या प्रकरणी पोलिसांत एन सी दाखल केली होती.मात्र महेंद्र बोरसे याने तपासिय अधिकारी यांना पैसे देऊन मला अंधारात ठेवून सदर चां गुन्हा बी समरी करून घेतली.या विरोधात मी कोर्टात केस दाखल केली आहे.महेंद्र बोरसे यांनी राग डोक्यात ठेवून माझ्या एकुलत्या एक मुलावर भा द वी ३०७ प्रमाणे खोटा गुन्हा दाखल केला आहे.त्यात मुलाला कारागृहात जावे लागले मात्र त्याला बेल मिळाल्याने घरी येत असताना महेंद्र बोरसे व त्याचा भाऊ यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून माझ्या मुलावर जीव घेणा हल्ला केला.त्यात त्याला जवळपास ८० टाके पडले असून त्याचा थोडक्यात जीव वाचला आहे.याबाबत पोलिसांनी योग्य तपास करत तीन आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्याने त्यांनी दिलेल्या जबानीत महेंद्र बोरसे व त्याचा भाऊ विनोद बोरसे जो सात्री येथील पोलिस पाटील आहे यानींच आम्हाला गोपाळ याला मारण्यास सांगितल्याची कबुली जबाब दिला आहे.असे असूनही मुख्य आरोपी महेंद्र बोरसे व त्याचा भाऊ विनोद बोरसे फरार आहे.त्याला त्वरित अटक करावी अन्यथा कुटुंबासह पोलिस अधीक्षक कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच माझ्या मुलावर केलेल्या जीव घेण्या हल्ल्यात मुख्य आरोपी असलेल्या महेंद्र बोरसे याचा फोटो स्थानिक मराठा समाजाच्या कार्यक्रम बॅनर वर फोटो कसा ? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मी सुद्धा मराठा समाजाचां असून या पंच मंडळात सदस्य आहे.याचे भान मराठा समाजाच्या या मंडळाने असू द्यायला हवी, अशी भावना व्यक्त केली.
