अमळनेर (प्रतिनिधी) : सुरत येथे दि. २२ नोव्हेंबर रोजी आयोजित ३३ व्या अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार संमेलनाचे गरिमामय वातावरणात समापन झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रताप महाविद्यालयाचे माजी हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. कुबेर कुमावत होते. त्यांच्या हस्ते हिंदी भाषा, साहित्य, प्रचार आणि प्रसार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशभरातील सुमारे ५५ मान्यवरांना ‘अखिल भारतीय हिंदी सेवी पुरस्कार’ व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा; गुजरात प्रांतीय राष्ट्रभाषा प्रचार समिती, अहमदाबाद आणि राष्ट्रभाषा प्रचारक मंडळ, सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने सुरत येथील जयदीप शारदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या विशाल प्रांगणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील शिक्षक, प्राध्यापक, साहित्यिक, लेखक आणि हिंदी भाषा प्रचारकांनी या संमेलनात सहभाग नोंदविला.

